InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

‘फोटो तुमचा, फोटोग्राफर पण तुमचाच, पण या फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल’

“फोटो तुमचा, फोटोग्राफर पण तुमचाच, पण या फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल,” असे टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड झाली. यावेळी महाविकासआघाडीच्या 162 आमदारांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली. यावर आशिष शेलार टीका केली.

“नुकतंच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यांचा एक पोरखेळ महाराष्ट्राने पाहिला. ओळख परेड ही आरोपीला गर्दी समूहातून साक्षीदाराने ओळखण्यासाठी केली असते. मात्र ता आपल्याच आमदारांना आपलेच नेते आरोपी मानत असतील. तर यापेक्षा लोकशाहीत जनादेशाचा अनादर कोणता असू शकतो.” असेही शेलार म्हणाले.

Loading...

“शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने ओळख परेड करुन जनतेने निवडून दिलेल्या आमदारांचा अपमान केला आहे. त्याशिवाय निवडून देणाऱ्या जनतेचाही अपमान केला,” असेही ते म्हणाले.

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.