InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

अजित पवारांच्या पराभवासाठी भाजपची तयारी,चंद्रकांत पाटील पुन्हा ठोकणार बारामतीत तळ

लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामती मतदार संघाकडे विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपने आपली पुर्ण यंत्रणाच बारामतीमध्ये लावली होती. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी बारामतीमध्ये तळच ठोकला होता. आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच भाजपने राज्यातील आगामी विधानसभेची तयारी सुरू केली आहे.

विधानसभेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पराभव करण्यासाठी भाजप तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांना आव्हान देण्यासाठी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा बारामतीत तळ ठोकणार आहेत. याआधी आम्ही बारामतीकडे संघटनाबांधणीकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं, पण आता त्यात सुधारणा करणार, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply