InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेवर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आलं. नितीन गडकरी यांचा शिवसेना पक्षप्रमुख यांच्यासोबत असलेला संवाद आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या विरोधी पक्षांतील नेत्यांसोबत असलेले संबंध लक्षात घेता, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव समोर आल्यास सत्तेची कोंडी फुटू शकते, असा अंदाज बांधण्यात येत होता. याबाबतच आता नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे.

‘राज्यात भाजप आणि शिवसेना युतीला कौल मिळाला आहे. ज्या पक्षाला जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री या न्यायाने भाजपचाच मुख्यमंत्री होईल. आमचे विधीमंडळ गटनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच पुन्हा सरकार स्थापन होईल. मी केंद्रात काम करत असल्याने पुन्हा राज्यात येण्याचा प्रश्न नाही,’ असं म्हणत नितीन गडकरी यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.