‘तुम्ही ही या.. वाट पहाते’; पंकजा मुंडेंनी समर्थकांना केलं आवाहन

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यानंतर काल झालेल्या भाजपच्या संघटनात्मक बैठकीलाही पंकजा गैरहजर होत्या. त्यामुळे या चर्चांना आणखीनच बळ मिळालं. पंकजा मुंडे यांनी 12 डिसेंबरला कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा मेळावा बोलावला आहे. या सर्व पार्श्वभूमीवरच त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करणारं ट्वीट केलं आहे.

’12 डिसेंबर ‘ रोजी सकाळी 11 वाजता आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना ‘गोपीनाथ गड’ येथे आमंत्रण. तुम्ही सारे या… हा दिवस आपल्या स्वाभिमान दिवस आहे आहे, तुम्ही ही याा.. वाट पहाते,’ असं भावनिक ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. या मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेतात, खरंच त्या भाजप सोडण्याचा निर्णय घेणार का, असे अनेक प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडले आहेत. त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.