InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘राऊतांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही’

- Advertisement -

शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपाचा प्रश्न सुटत नसल्यानं सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत दररोज भाजपावर टीकेचे बाण सोडत असल्यानं महायुतीतल्या दोन मोठ्या पक्षांमधील दरी वाढली आहे. अर्थमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रकार परिषदेत याचा प्रत्यय आला. राऊत यांनी केलेल्या काही आरोपांना मुनगंटीवार यांनी उत्तरं दिली. मात्र एका क्षणी राऊत यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

इतर पक्षांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाकडून केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर भाष्य करताना कुणीही अशा पद्धतीनं आमदारांचा अवमान करू नये असं मुनगंटीवार म्हणाले. लाखो मतदारांच्या आशीर्वादानं जो निवडून येतो, त्याच्याबद्दल अशा पद्धतीनं अपशब्द काढणं योग्य नाही, असं मुनगंटीवारांनी म्हटलं. शिवसेनेचे आमदार कधीही फुटणार नाहीत. कारण त्यांची पक्षावर निष्ठा आहे, असंदेखील त्यांनी सांगितलं.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.