InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

सपना चौधरीच्या प्रवेशामुळे भाजप नेते नाराज

गायिका आणि नृत्यांगना सपना चौधरीने नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. तिने ज्या कार्यक्रमाद्वारे भाजपमध्ये प्रवेश केला तो भव्यदिव्य स्वरूपाचा होता. यामुळे संघाचे पदाधिकारी आणि भाजपचे नेते नाराज झाले असल्याचे बोलले जाते.हा कार्यक्रम सपना चौधरीच्या प्रवेशासाठीच ठेवण्यात आला होता की काय, असा आम्हाला प्रश्न पडायला लागला असल्याचे या नाराज पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

एका वेसबाईटने दिलेल्या बातमीत म्हटले आहे की, पक्ष सदस्य मोहिमेच्या कार्यक्रमात अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, कार्यक्रमाचे एकूण स्वरूप पाहता हा कार्यक्रम सपना चौधरीसाठीच ठेवण्यात आल्याचे वाटत होते. पक्षप्रवेश झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सपना चौधरीची पत्रकार परिषदही ठेवण्यात आली होती. 7 जुलैला भाजपच्या सदस्य मोहिमेच्या कार्यक्रमात सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल हे उपस्थित होते.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.