‘आलं अंगावर, ढकललं केंद्रावर… भाजप नेत्याची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा रद्द केल्यामुळे राज्यात यावरून राजकारण चालू आहे. अशातच राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना निवदेन सादर केलं. हे आरक्षण राष्ट्रपतींच्या माध्यमातून दिलं जावं यासाठी हे निवदेन देण्यात आलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आदी नेत्यांचा समावेश होता.

आपल्या सर्वांना कल्पना आहे, मागील आठवड्यात मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला. त्या निकालाच्या अनुषंगाने आजची आमची ही भेट होती. त्या निकालपत्रावर आम्ही आमची प्रतिक्रिया देताना हेच सांगितलं होतं, की त्यात जे सांगितलं गेलेलं आहे की आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्याचा नसून केंद्राचा आहे, राष्ट्रपतींचा आहे आणि साहाजिकच आहे आम्ही राष्ट्रपतींनी व केंद्र सरकारला विनंती करण्यासाठी, आमच्या ज्या भावना आहेत. त्या पत्राच्या माध्यमातून तिथं पोहचवण्यासाठी आज राज्यपालांची भेट घेतली अलल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

ठाकरे सरकारच्या या मागणीनंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘आलं अंगावर, ढकललं केंद्रावर… जे यांना झेपत नाही ते केंद्राने करून दिले की ‘मुख्यमंत्र्यांचा विजय’… असा निलाजरा PR करायचा. हेच आहे ठाकरे सरकारचे (की माग रे सरकार?) महाराष्ट्र मॉडेल,’ असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा