विचित्र वक्तव्य करून भाजप नेते आपली संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतायत; जयंत पाटलांची टीका

मुंबई : लावणी सम्राज्ञी आपल्या लावलीने रसिकांना साद घालणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला.

तसेच या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती. यानंतर आता मात्र दरेकरांच्या या वक्तव्यावर राज्यातील राजकारण चांगलाच पेटलय. तसेच प्रविण दरेकरांना टीकेचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी देखील दरेकर यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.

‘भारतीय जनता पक्षाचे नेते वेगवेगळे विचित्र वक्तव्य करत असतात. त्यातून ते त्यांची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करतात. महिलांबाबत अशी विधानं करणं अत्यंत गैर आहे. त्यामुळे त्यांचा जितका निषेध करता येईल तो कमी आहे. ते असं कसं बोलू शकतात हाच प्रश्न आहे. त्यांच्या पक्षात तशी पद्धत असेल. आम्ही अशी टोकाची विधानं करत नाही, अशा वक्तव्याना वारेमाप प्रसिद्धी मिळते हे दुर्दैवी आहे,’ अशी खंत देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा