भाजपानं सचिन तेंडुलकरशी बोलणी केली असतील, माझ्याशी बोलण्याची त्यांच्यात धमक नाही: सचिन पायलट

राजस्थान : काँग्रेसमधील मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ज्योतिरादित्य सिंदियांपाठोपाठ जितिन प्रसाद यांनी देखील भाजपाचा रस्ता धरला आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यापाठोपाठ सचिन पायलट देखील भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. भाजपा नेत्या रिटा बहुगुणा यांनी नुकतंच त्यासंदर्भात विधान केलं होतं. यावर आता सचिन पायलट यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“रिटा बहुगुणा जोशी म्हणाल्या आहेत की त्यांचं सचिनशी बोलणं झालं आहे. त्यांचं कदाचित सचिन तेंडुलकरसोबत बोलणं झालं असेल. माझ्याशी बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाहीये”, असं सचिन पायलय म्हणाले आहेत.

रिटा बहुगुणा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन पायलट भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. “जितिन प्रसाद यांच्याप्रमाणेच सचिन देखील लवकरच भाजपामध्ये दाखल होणार आहे. काँग्रेस पक्षामध्ये त्यांना चुकीची वागणूक मिळते आहे”, असं रिटा बहुगुणा म्हणाल्या होत्या. त्यावरच सचिन पायलट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा