“चाटायचं असेल तेव्हा पवार साहेब, चावायचं असेल तेव्हा बाळासाहेब, याला म्हणतात… लोंबत्या राऊत!”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे कुटुंबीय आणि निकटवर्तीयांना केंद्रीय तपास यंत्रणांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनात काल पत्रकारपरिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषद शिवसेनेची असली तरी याचा मुख्य आकर्षण बिंदू हे संजय राऊत हेच होते. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर अनेक आरोप केले.

तसेच यावेळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठमोठे गौप्यस्फोट केले आहेत. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून आघाडीतील प्रमुख नेत्यांमागे ईडी, सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा लागल्याचं बघायला मिळालं होतं. पण आता याच चौकशीवरुन संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठमोठे गौप्यस्फोट काल केले.

यानंतर या पत्रकार परिषदेवर विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. “चाटायचं असेल तेव्हा पवार साहेब, चावायचं असेल तेव्हा बाळासाहेब, याला म्हणतात… लोंबत्या राऊत!”, अशी खोचक टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच राऊतांच्या या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा