InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजपाचे आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांची पक्षातून हकालपट्टी

उत्तराखंडचे खानपूर मतदारसंघातील भाजपाचे आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांची पार्टीतून हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्रणव सिंह चॅम्पियन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये प्रणव सिंह चॅम्पियन दारुच्या नशेत बंदुका घेऊन डान्स करताना दिसून आले. त्यांच्या या कृत्यामुळे भाजपाने त्याच्यावर हकालपट्टीची शुक्रवारी कारवाई केली.

प्रणव सिंह चॅम्पियन आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ कोणत्या मारहाणीचा नव्हता, तर प्रणव सिंह चॅम्पियन आपल्या हातात बंदुका घेऊन दारुच्या नशेत डान्स करतानाचा होता.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply