‘राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार येत्या मे – जून महिन्यापर्यंत कोसळेल’

कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. ‘राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार येत्या मे – जून महिन्यापर्यंत कोसळेल’, असा दावा भाजपचे प्रवक्ते आणि विधानपरिषदेतील आमदार गिरीश व्यास यांनी केला.

कर्नाटक निकालानंतर राज्यातील भाजपच्या गटात हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळेल असा आम्हाला विश्वास आहे, असं गिरीश व्यास यांनी सांगितलं.

कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. 15 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने तब्बल 12 जागांवर विजय मिळवला. दोन जागा काँग्रेसने तर एक जागा अपक्षने जिंकली. भाजपला कर्नाटकात सत्ता टिकवण्यासाठी 15 पैकी किमान 6 जागांवर विजय मिळवणं आवश्यक होतं. मात्र मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्या नेतृत्त्वातील भाजपने तब्बल 12 जागांवर विजय खेचून आणला.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.