भाजप-मनसे युतीचा श्रीगणेशा! ‘या’ जिल्ह्यात अखेर युतीची अधिकृत घोषणा

मुंबई : आगामी जिल्हा परिषद, महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अखेर पालघर जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यााबाबतची अधिकृत घोषणा केली. राज्यातील मनसे आणि भाजपची ही पहिलीच युती ठरणार आहे .
पालघर जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक लवकरच पार पडणार आहे. याकरिता सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर मनसेने हिंदुत्त्वाचा मुद्दा स्वीकारला. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप युती होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पालघर जिल्हापरिषदेत 57 सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना 18, राष्ट्रवादी 17, भाजप 12, माकप 5, बहुजन विकास आघाडी 4, तर काँग्रेसचा एक असे सदस्य निवडून आले होते . मात्र जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 17 सदस्यांपैकी 8, शिवसेनेच्या 18 सदस्यांपैकी 3, भाजपच्या 12 सदस्यांपैकी 3 तर माकपच्या 5 सदस्यांपैकी 1, अशा एकूण 15 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. 57 सदस्यांपैकी 15 सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले.
उर्वरित 42 सदस्यसंख्येमुळे बहुमताचा झालेला 22 हा आकडा गाठण्यात महाविकास आघाडीसमोर कोणतेही मोठे आव्हान नाही. यामुळे अध्यक्षपदी शिवसेनेच्या वैदेही वाढाण तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर सांबरे यांची निवड झाली. मात्र आता 57 सदस्यांपैकी 15 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने आता होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मनसेने हातमिळवणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भरकटलेली वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना नेमकं कुठं जायचं आहे?
- जनाब संजय राऊत MIM की मोहब्बत कौन? गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
- ‘ओवेसी भाजपाच्या यशाचे सूत्रधार’, ‘फोडा-झोडा व जिंका’; शिवसेनेचा निशाणा
- “ममता बॅनर्जी मोदींपेक्षा अधिक लोकप्रिय, अनेक राज्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास तयार”
- काँग्रेसला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला; राज्यसभा पोटनिवडणुकीतून भाजपची माघार