भाजप खासदार प्रीतम मुंडे अडचणीत येणार?

लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा पराभव केला. यावेळीची निवडणूक प्रीतम मुंडे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरेल, असं बोललं जात होतं. मात्र प्रीतम यांनी राष्ट्रवादीवर मोठा विजय मिळवला. मात्र भाजप खासदार प्रीतम मुंडे  या अडचणीत येण्याची शक्यता आहे.

प्रीतम मुंडे यांनी आपल्या शपथपत्रात खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली, असा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यानच अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता कालिदास आपेट यांनी वकिलांमार्फत प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.