InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुणे महापालिकेतील गाव पातळीवरील निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीला यश

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४२ (अ) पुरूषांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेश ढोरे आणि (ब) महिलांमधून भाजपाच्या अश्विनी पोकळे विजयी झाल्या आहेत.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांच्या दोन जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपकडून अश्विनी पोकळे, शिवसेना पुरस्कृत अमोल हरपळे, राष्ट्रवादीचे गणेश ढोरे तर काँग्रेसकडून भाग्यश्री कामठे हे उमेदवार रिंगणात होते. या दोन जागांसाठी रविवारी मतदान पार पडले. यामध्ये एकुण १ लाख ९६ हजार मतदार होते. त्यापैकी ५१ हजार ४२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानुसार २२ टक्के मतदान झाले.

या आकडेवारीवरून भाजपच्या अश्विनी पोकळे ९३२ मतांनी विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या निवडणुकीत प्रत्येकी एका जागेवर भाजप आणि राष्ट्रवादी विजयी झाल्याने आगामी विधानसभा निवडणुक नक्कीच चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणाऱ्यांनी शेतकऱ्यांचा क्षोभ शमवावा; उद्धव यांचे आवाहन 

विखे, क्षीरसागर यांना मंत्रीपद म्हणजे राजकीय भ्रष्टाचार

विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply