InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

गोव्यातील आमदारांना भाजप कडून कोट्यवधींची ऑफर- डॉ चेल्लाकुमार

- Advertisement -

काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या गोव्यातील दहाही आमदारांना पक्षांतर बंदी कायद्यातर्गंत अपात्र ठरवण्यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती काँगेसचे केंद्रीय निरीक्षक डॉ. चेल्लाकुमार यांनी दिली.

गोव्यातील घडामोडींवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी डॉ चेल्लाकुमार बुधवारी मध्यरात्री गोव्यात दाखल झाले. दहाही आमदारांना भाजप कडून कोट्यवधींची ऑफर देण्यात आली होती. त्यामुळेच आमदारांनी भाजपात उडी घेतली असा आरोप त्यांनी केला.

- Advertisement -

गोव्यात पोचलेल्या चेल्लाकुमार यांनी प्रतापसिंह राणे, दिगंबर कामत, रवी नाईक, लुईझिन फालेरो आणि आलेक्स रेजिनालड लॉरेन्स या उर्वरित आमदारांची भेट घेतली. मडगाव एका खासगी हॉटेलवर त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार दिगंबर कामत यांची भेट घेऊन चर्चा केली. लवकरच नवीन विरोधी पक्ष नेता निवडला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.