BJP on Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलं ; भाजप मंत्र्याची टीका
BJP on Mahavikas Aghadi | मुंबई : भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांचे वक्तव्य मी पाहतो आहे. ते भ्रमिष्ट झाल्यासारखे बोलतात. सत्ता गेली तर किती वैफल्य असावं. आमचे सरकार भक्कम आहे आम्ही अडीच वर्षे पूर्ण करणार आहोत. तसेच पुढेचे २५ वर्षे आम्ही राहणार आहोत. आमचं सरकार आल्यापासून राज्यातील भविष्यकारांची संख्या वाढली आहे. हे सर्व पोपटपंची सुरू आहे, असे विखे पाटील म्हणाले.
यापूर्वी विखे पाटील यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. काही नेत्यांनी शेतक-यांच्या मालकीचे कारखाने संपुष्टात आणले असून खाजगी कारखाने उभारणीवर भर दिला, असा आरोप त्यांना नाव न घेता केला होता.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सराकरवर (Shinde-Fadnavis government) शिर्डी येथील सभेतून टीका केली होती. यावरु देखील विखे पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. आमचं अपयश दाखविण्यापेक्षा तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून जातात यापेक्षा दुसरं अपयश नाही, असे विखे पाटील म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील हे सतत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत असतात. यांच्यात अनेक वर्षांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जन्म हा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना संपवण्यासाठी झाला असल्याचे सुजय विखे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- Javhavi Kapoor | जान्हवी कपूरची ‘या’ अभिनेत्यासोबत आहे काम करण्याची इच्छा
- Sushma Andhare | राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘पार्सल’ म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना सुषमा अंधारेंचा पलटवार, म्हणाल्या…
- Chandrashekhar Bawankule | बारामती नंतर आता एकनाथ शिंदेच्या ठाण्यावर भाजपचा डोळा, चंद्रशेखर बावनकुळेंची जोरदार तयारी
- Nokia Mobile Launch | नोकियाने लाँच केला नवा Flip मोबाईल
- IND vs ZIM ICC T20 : उपांत्य फेरीचे तिकीट मेलबर्नमध्ये होणार पक्के? टीम इंडिया सज्ज!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.