‘दाऊदला परत आणण्याचं भाजपाचं आश्वासन होतं, त्याचं काय?’; शिवसेना नेत्याचे प्रत्युत्तर

भाजपा नेते मोहित भारतीय यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयावर टीका केल्याने शिवसेना नेत्यांनीही भाजपाला धारेवर धरले आहे. आरे आणि नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले, आता दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीनचीट देणार असं मोहित भारतीय यांनी म्हटलं होतं. त्यावर शिवसेना नेते सचिन अहिर यांनी भाजपाला सवाल केला आहे.

सचिन अहिर यांनी ट्विट करुन सांगितल आहे की, राज्यात सत्ता गेल्यामुळे भाजपा नेते मोहित भारतीय दु:खी झाले आहेत. शिवसेना तुमच्यासोबत युतीमध्ये होती तेव्हा काम करु दिलं नाही, आता शिवसेना काम करतेय त्यावर टीका करत आहात. तसे, भाजपने दाऊदला भारतात परत आणण्याचे आश्वासन दिले, त्यावरील काही अपडेट्स मिळतील का? असा सवाल सचिन अहिर यांनी केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.