स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांचं २० लाखांचं कर्ज भाजपानं फेडलं

मुंबई : एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणानंतर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले गेले. तसंच स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी पत्रात मांडलेली त्याची व्यथा प्रकाशझोतात आली आणि त्याच्यावर कर्ज असल्याचे उघड झाले.

आता भाजपने स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांवरील कर्जाचा भार हलका केला आहे. लोणकर कुटुंबीयांवर असलेले 19.96 लाखांचे कर्ज भाजपने फेडले आहे. स्वप्नील लोणकरचे वडील सुनील लोणकर यांच्यावर १९ लाख ९६ हजार ९६५ रुपयांचं कर्ज होतं. शिवशंकर ग्रामीण बिगरशेती पतसंस्था मर्यादित या संस्थेचं कर्जाची परतफेड आज भाजपकडून करण्यात आली.

मुलाची आत्महत्या, त्यात घरातील प्रिंटिंग प्रेस बंद आणि कर्जफेडीसाठी पतसंस्थेनं लावलेला तगादा यामुळे स्वप्नीलचं कुटुंब त्रस्त झालं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या प्रयत्नामुळे भाजपकडून स्वप्नीलच्या कुटुंबाचं कर्ज फेडण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते धनादेश लोणकर कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा