InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राहुलच्या वागण्याने काँग्रेसची अधोगती; राहुल गांधीनी वापरलेल्या Modilie शब्दावरुन भाजपचा टोला

राहुल गांधी यांनी इंग्रजी डिक्शनरीमध्ये Modilie नावाचा नवीन शब्द आला आहे. त्याचा स्क्रीनशॉट्स काढून ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला होता.

राहुल गांधी यांनी 24 तासापूर्वी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये नवीन राजकारणाची भाषा पुढे आणत मुद्द्यावरुन आणि विचारधारेवर निवडणुकीची लढाई लढू मात्र हिंसक आणि वेदनादायक प्रचार करु नये. ते देशाच्या राजकारणासाठी घातक आहे असं सांगितलं. मात्र 24 तास उलटल्यानंतर राहुल गांधींना याचा विसर पडला आहे. प्रचारातील खरे मुद्दे घेऊन चर्चा करण्याऐवजी त्यांनी केलेलं ट्विट मुर्खपणाचं आहे असा आरोप भाजप प्रवक्ते जी.व्ही. एल नरसिंहराव यांनी केलं आहे.

राहुल गांधींच्या अशा वागण्यामुळे काँग्रेस पक्षाची अधोगती होत आहे. त्यामुळे राहुल मोठा हो असा टोला भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply