‘कोरोनाची तिसरी लाट आलीच तर त्याला भाजप जबाबदार’

मुंबई : कोविडचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात धुमाकुळ माजवत आहे. सध्या देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. अशातच मुंबईत सध्या ५ हजार नवीन केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्राची चिंता आता वाढताना दिसत आहे. अशातच आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी कोरोनाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

मलिक म्हणले कि, देशात कोरोनाची तिसरी लाट आली तर त्याला भाजप जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे. मलिक यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर टीका केली. उत्तर प्रदेशात पंतप्रधान मोदी जाहीरसभा घेत आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रसार देशातील बहुतांश राज्यांत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यामुळे एकीकडे चिंता वाढली असून, दुसरीकडे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार रंगात आला आहे. या प्रचारसभांना मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. यावरून नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.इतर राज्यांत निवडणुका असताना दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपाच्या लोकांचा हात राहील हे स्पष्ट आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा