“तापलेल्या तव्यावर स्वत:ची चपाती भाजण्याची सवय भाजपने बदलावी”

नवी दिल्ली : भारतीय क्रीडा विश्वातील कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल. त्यांनी ट्विटरव्दारे हि घोषणा केली.

यानंतर काँग्रेसने या निर्णयावर सडकून टीका केली. यानंतर आता बाकी राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरवात केलीय. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

आधीच्या सरकारने केलेल्या कामांची नावे फक्त राजकीय द्वेषातून बदलून त्याचं श्रेय लाटण्याची या सरकारची जुनी खोड आहे. तापलेल्या तव्यावर स्वतःची चपाती भाजण्याची सवय भाजपने आता तरी बदलायला हवी. जनतेच्या आणखीही बऱ्याच मागण्या आहेत त्याकडे देखील प्रधानसेवकांनी लक्ष द्यावं, अशी टीका चाकणकरांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा