“पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने पक्षात सर्वकाही अलबेल आहे असं भाजपने समजू नये”

मुंबई : विधानपरिषदेसाठी भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने नारळ दिला. यानंतर या यादीमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव वगळल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजपने पंकजा मुंडे यांना डच्चू देत उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. याआधी पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले. नाराज समर्थकांनी आज औरंगाबाद येथील भाजप कार्यालयावर दगडफेक केली होती.

तसेच पुढे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा ताफा बीड जिल्ह्यातील पारगाव येथे दाखल झाला होता. या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न मुंडे समर्थकांनी केला आहे. यावेळी त्यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली होती. यावरून आता कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारली यासंदर्भात सतेज पाटलांना विचारले असता ते म्हणाले कि, भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने पक्षातील ओबीसी नेते प्रचंड नाराज आहेत. भाजप आमदारांना वेगवेगळ्या गोष्टी सांगून तिथे नेण्यात आले होते. पक्षात सारं काही अलबेल आहे असं भाजपाने समजू नये, असंही सतेज पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या