भाजपाने आमच्यासोबत मिळून राज्य करावे; संजय राऊतांची खुली ऑफर

नागपुर : २०१९ ला शिवसेनेने २५ वर्षे सुरु असलेली भाजपासोबतची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकासआघाडी अस्तित्वात आल्यापासून या आघाडीच्या विचारसरणीवर या सरकारवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भिन्न विचारसरणीचे हे तीन पक्ष एकत्र कसे येऊ शकतात? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

तसेच आता महाविकास आघाडी सरकारला येत्या २८ डिसेंबर रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत अनेक विषयांवर मनसोक्तपणे मते मांडली. सरकार पडणार अशा पुड्या सोडत असते, पण याची गरज काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष म्हणून भाजपासुद्धा राज्यावर ‘रूल’ करू शकतो, अशी थेट ऑफर राऊतांनी भाजपाला दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, संसदीय लोकशाही प्रक्रियेत विरोधी पक्षाचं खूप महत्त्वाचं स्थान असतं. विरोधी पक्षनेता हा शॅडो चीफ मिनिस्टर असतो आणि भाजप तेवढा ताकदीचा विरोधीपक्ष आहे. तर फालतू चिखलफेक करता, धुरळा उडवता हे तुमच्या प्रतिष्ठेला शोभत नसल्याचा टोलाही संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा