धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्या नाहीतर, भाजपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

राज्याच्या राजकारणात सद्या एक चर्चेचा विषय समोर आलाय. राजकीय वर्तुळात याबाबत चर्चेला उधाण आलय. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याची बातमी समोर आली. २००६ सालापासून धनंजय मुंडे तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते अशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्य़ात रेणू शर्मा या महिलेने केली होती.

यानंतर या प्रकरणाबरोबर मुंडे यांनी आपण करुणा शर्मा सोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं सांगितलं आहे. बलात्काराचे आरोप करणारी तरूणी हा करूणा शर्मा यांची बहीण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक झालं असून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मात्र यानंतर आता भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात खापरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. या घटनेमुळे समाजावर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे वस्तुस्थितीचं गांभीर्य ओळखून मुंडेंचा राजीनामा घ्यावा, असं खापरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, मुंडेंचा राजीनामा घ्यावा नाहीतर आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल याची आपण नोंद घ्यावी, असं म्हणत खापरेंनी मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.