‘देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार’

शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शिवसेना आमचाच मुख्यमंत्री होणार असा दावा करत आहे. यासंबंधी सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केले आहे. युती व्हावी हीच आमची इच्छा असून अल्पमतातील नाही तर स्थिर सरकार देणार असल्याचेही ते म्हणाले.

भाजपाने सरकार स्थापण्याची सारी तयारी केली आहे. शिवसेनेला काँग्रेसचा पाठींबा मिळणार नाही, त्यामुळे सेनेलाही भाजपशिवाय पर्याय नाही. सेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर 2014 प्रमाणेच अल्पमतातील सरकार स्थापण्याची भाजपची योजना आहे. 2014 प्रमाणेच सेना नंतर सरकारमध्ये सहभागी होईल, असे भाजप नेत्यांना वाटते. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आज राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

Loading...

 

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.