InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे’, वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप नेत्याचं निलंबन

महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप नेते अनिल सौमित्र यांच पक्षातून निलंबन केले आहे. अनिल सौमित्र यांनी फेसबूक पोस्टमध्ये महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त पोस्ट लिहिली होती.

‘गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे करोडो पुत्र जन्माला आले. काही लायक होते तर काही नालायक,’ अशी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली.

भाजप नेत्यांकडून अनेक वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्याने, आता याची दखल खुद्द पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देखील घेतली आहे. साध्वी प्रज्ञासिंह, केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र आता थेट आता भाजपनं अनिल सौमित्र यांचं निलंबन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.