विनोद तावडेंनी पंकजा मुंडेंची घेतली भेट; भाजपाकडून जोरदार हालचाली सुरु

पंकजा मुंडे यांच्या मनधरणीसाठी भाजपाकडून धावपळ सुरू असल्याचेच चित्र आहे. सोमवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सर्व व्यवस्थित असल्याचं सांगितलं होत. पण, २४ तासातच भाजपाचे नेते विनोद तावडे पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.

परळी मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे या पक्षापासून बाजूला गेल्या होत्या. सार्वजनिक जीवनात वावरत असताना त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाची नाराजी दिसून येत होती. पण, पराभवाबद्दल त्यांनी फार भाष्य केले नव्हते. त्यानंतर भाजपाचे सरकार चार दिवसात कोसळल्यानंतर पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून मार्ग ठरवणार असल्याचं म्हटलं होतं.

या पार्श्वभूमीवर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे पंकजा यांची भेट घेण्यासाठी रॉयलस्टोन या शासकीय बंगल्यावर आले आहेत. तावडे यांच्याबरोबर माजी राज्यगृहमंत्री राम शिंदे हे बरोबर असल्याचं समजते.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.