BJP vs MNS | “लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदींवर टीका करणाऱ्यांसोबत युती कशाला” ; भाजपच्या मोठ्या नेत्याचा विरोध

BJP vs MNS | पुणे : एकीकडे भाजप, शिंदे गट, मनसे, असे समिकरण राज्यात तयार झाल्याचे चित्र आहे. मनसेकडून भाजपवर टीका देखील बंद झाली आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या (BJP-MNS alliance) चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमिवर माजी भाजपचे खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. मनसेसोबत युती करण्याची भाजपला गरज नाही. भाजपने मनसेसोबत युती केल्यास विरोध करणार, असेही काकडे म्हणाले. लाव रे तो व्हिडीओ म्हणत मोदींवर टीका करणाऱ्यांसोबत युती कशाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

संजय काकडे (Sanjay Kakade)  म्हणाले, “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) , भाजप नेत्यांच्या राज ठाकरेंसोबत गाठीभेटी मी पाहत आहे. बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) देखील पुण्यात येऊन गिरीश बापट (Girish Bapat) यांना भेटून गेले. परंतु ह्या गाठीभेटी सर्वच पक्षात होच असतात. याचा अर्थ युती होईल, असं मला वाटत नाही. पुण्यात पण आम्ही युती करणार नाही. तसेच महाराष्ट्र स्तरावर प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने सांगू की आम्ही युती का करायची. राज ठाकरे यांनी २०१९ ला नरेंद्र मोदी यांच्यावर वाईट टीका केली होती. लाव रे तो व्हिडीओ, लाव रे ती सीडी, अशा प्रवृत्तीच्या मानसाशी आम्ही का युती करायची. हे मला योग्य वाटत नाही.”

मनसे शिवसेनेची बी टीम-

“आम्ही युती केली तरी ती मतं आम्हाला पडणार नाहीत. मनसे शिवसेनेची बी टीम आहे. हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. शिवसेना फुटून मनसे झाला आहे. आम्ही युती केली आणि टीकटे जरी दिली तर लोक शिवसेनेला मतं देतील. त्यामुळे युती करण्याची आवश्यकता नाही. युती करण्याची गरज पडली आम्ही पारंपारीक शिवसेनेसोबत जाऊ”, असे वक्तव्य माजी खासदार संजय काकडे यांनी केले आहे.

भाजप-मनसे युती होणार?-

मुंबई, पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप-मनसे युती होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आगे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटासोबत देखील राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. त्यामुळे हे समीकरण महत्त्वाचे ठरू शकते. मात्र संजय काकडे यांच्या विधानाने चर्चेला उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.