BJP vs NCP | खर तर राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच विरोध करत आली ; भाजपचा जोरदार पलटवार

BJP vs NCP | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे भाजप बॅकफूटवर आली आहे. या दोघांच्या वक्तव्यावर भाजपचे बहुतांश नेते मौन बाळगून आहेत. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले असून भाजपवर हल्लाबोल करत आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या दोघांचीही पाठराखण केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी देखील यावर गोलमाल उत्तरे दिली. त्यामुळे भाजपवर जोरदार टीका होत आहे. या भाजपने राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे.

भाजपने आपल्या अधीकृत फेसबुक पेजवर राष्ट्रवादीवर टीका केली आहे. “राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते, असा भासवण्याचा प्रयत्न करत आहे. खर तर राष्ट्रवादी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच विरोध करत आली आहे. तसं राष्ट्रवादीने कृतीतूनही दाखवून दिलं आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या योजनांची नावे बदलण्यात आले. हा महाराष्ट्र शाहू – फुले – आंबेडकरांचा आहेच. यात कोणतंही दुमत नाही. पण, तीन महापुरुषांचे नाव घेताना राष्ट्रवादीकडून जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख टाळला जातो,” असा आरोप भाजपने केला आहे.

जितेंद्र आव्हाड सारखे अफजल प्रेमी नाराज होतील-

“कारण, जितेंद्र आव्हाड सारखे अफजल प्रेमी नाराज होतील या भीतीने. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कायम स्टेजच्या खाली लावली जाते. कारण शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते जाणता राजा म्हणून हाक मारतात. राज्यात आणि केंद्रात शरद पवार यांनी अनेक मंत्रीपदे उपभोगली. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे गड किल्ल्यांची दुरावस्था त्यांना थांबवता आली नाही. शरद पवारांच्या काळात औरंगजेब, अफजलच्या कबरी मात्र सुरक्षित जतन करून ठेवल्या,” असे देखील भाजपने म्हटले आहे.

“मागील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारच्या काळात गड किल्ले संवर्धनासाठी ‘रायगड प्राधिकरण’ स्थापन करण्यात आल होत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर प्राधिकरणाचे महत्व कमी करून निधी थांबवण्यात आला. आज हे महाराजांच्या नावाचा वापर करून राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्न करत आहेत.”

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.