मार्च महिन्यात ठाकरे सरकार कोसळून भाजप सत्तेत येणार : नारायण राणे

जयपूर : २०१९ ला शिवसेनेने २५ वर्षे सुरु असलेली भाजपासोबतची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत राज्यात सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकासआघाडी अस्तित्वात आल्यापासून या आघाडीच्या विचारसरणीवर या सरकारवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भिन्न विचारसरणीचे हे तीन पक्ष एकत्र कसे येऊ शकतात? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

यानंतर हे सरकार पडणार असं विरोधकांकडून वारंवार सांगितलं जात आहे. केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी आता याबाबत वक्तव्य केल आहे. मार्च महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार अशी नवी राजकीय भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली आहे.नारायण राणे आज हे शुक्रवारी जयपूर दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी हा दावा केला आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,महाराष्ट्रात भाजपचे सरकार नाही, त्यामुळे तिथे तसे होत आहे.लवकरच महाराष्ट्रात भाजपचं सरकार येईल येत्या मार्च महिन्यात भाजपचे सरकार येईल आणि तुम्हाला सर्वांना अपेक्षित असा बदल दिसून येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा