InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पश्चिम बंगाल हिंसाचार :- भाजपने केली तृणमूलवर कारवाईची मागणी, आज भाजपकडून धरणे आंदोलन

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरुन निवडणुकीला गालबोट लागलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेस यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचाराविरोधात भाजपाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन टीएमसीवर कारवाईची मागणी केली. तसेच आज नवी दिल्ली येथील जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करणार आहे.

हिंसाचारानंतर विद्यासागर कॉलेजला पोहचलेल्या ममता यांनी ईश्वरचंद्र यांची प्रतिमा तोडण्याच्याविरोधात तृणमूलकडून रॅली काढण्याची घोषणा केली आहे. अमित शहा देवापेक्षा मोठे आहेत का? त्यांच्याविरोधात कोणी प्रदर्शन करु शकणार नाही. प्रतिमा तोडणारे भाजपाचे गुंड होते असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.