“मनसे असो वा राष्ट्रवादी, भाजप युती करणारच नाही”

जळगाव: माजी मंत्री आमदार आशीष शेलार यांचा सध्या उत्तर महाराष्ट्र दौरा सुरु आहेत. यादरम्यान शेलार यांनी राज्य सरकारला चांगलाच धारेवर धरलं आहे. गेले जवळपास २ वर्षे झाली कोरोनाचे संकट असो की पूरस्थिती असो, या परिस्थितीत माणसांना जगविण्याऐवजी मेलेल्या माणसांचे आकडे जाहीर करणारे सरकार राज्यात आहे, अशी टीका आशीष शेलार यांनी जळगावात केली.

तसेच पुढे मुंबई विमानतळाला भाजप सरकारनेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले असून आता या सरकारने हस्तांतराचा ठराव करून नंतर टक्केवारी घेतली जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला. जळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करीत मनसे असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो, यांच्याशी भाजप युती करणार नाही, असेही स्पष्ट केले.

दरम्यान, परप्रांतियांवर अतिक्रमण करू नये हीच माझी भूमिका आहे. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे निर्णय पटले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. जे मला पटलं नाही, त्यावर मी टीका केली. स्पष्ट बोलण्यात चुकीचं काय आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर मनसे भाजप युतीच्या आशा मावळल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा