InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजपात जाणार नाही, आघाडीने तिकीट दिले तर ठीक नाहीतर अपक्षच – सुजय विखे पाटील

‘भाजपात मी जाणार नाही, आघाडीने जर तिकीट दिले नाहीतर अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार’,अशी घोषणाच डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र डॉ. सुजय विखे पाटील यांचा युवक मेळावा संपन्न झाला. यावेळी त्यांनी निवडणूक लढवण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

‘गेल्या तीन पिढ्यांपासून समाजाची सेवा करत आलो असून पुढेही सर्वसामान्यासाठीच कार्य करणार आहे. पण या पुढच्या काळात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीकडे आपण उमेदवारीचा आग्रह धरणार आहे. पण काही अडचणीतून उमेदवारी त्यांनी दिली नाही किंवा माझ्यापेक्षा चांगला उमेदवार जर मिळाला तर मी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार’, असं सुजय विखे पाटलांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply