InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बंगाल अशांत करण्याचा भाजपचा प्रयत्न- ममता बॅनर्जी

- Advertisement -

बंगाल म्हणजे गुजरात नव्हे,’ असा हल्ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला असून, भाजप राज्यात अशांतता माजवीत असल्याचा आरोप केला आहे. भाजपविरुद्ध आवाज उठविणारी मी एकमेव असल्यामुळे माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

- Advertisement -

तसेच भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचे षड्‌यंत्र आहे. पण, आम्ही बळापुढे झुकणार नाही.” राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारावरून भाजपच्या अनेक मंत्र्यांनी तृणमूल कॉंग्रेसवर टीकास्त्र सोडल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.

जबाबदारीने वार्तांकन करावे, असा सल्ला ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे. भाजप तुम्हाला जाहिराती देत असल्यामुळे तुम्ही त्यांना अनुकूल बातम्या देत आहात, असा आरोप त्यांनी केला. खोट्या बातम्या देऊन आमचे सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात आहे. तसेच, सोशल मीडियाच्या विविध संकेतस्थळांवरून अशा बातम्या दिल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.