‘भाई’ किंवा ‘भाऊ’ कोणीही एक पराभूत होवू शकतो; भाजपाचा दावा

मुंबई : राज्यसभेच्या अनपेक्षित विजयानंतर आता भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. सहाव्या जागेसाठी झालेल्या लढतीत भाजपने सेनेचा पराभव करत विजय मिळवला. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्यानं निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. भाजपचे ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राज्यसभेतील पराभवानंतर आता विधान परिषदेसाठी आघाडीने कंबर कसली आहे. तसेच भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे त्यांच्यातील खरी वर्चस्वाची लढाई आता सुरु झाली आहे. विधान परिषद भाजप, आणि काँग्रेस आमने सामने येणार आहेत. मात्र खरी कसोटी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाची लागणार आहेच.

पण आता त्या अगोदर मुंबईतील विधानपरिषद निवडणूकीच्या मैदानात ही लढत होणार आहे. भाजपने गुप्तमतदान पध्दतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेनेच्या मतात फुट पाडून ही मते आपल्या पदरात पाडून घेतल्यास खडसे यांचा घात होवू शकतो असेही सांगितले जात आहे. खडसे यांचा पराभव हाच भाजपचा रणनितीचा मोठा विजय असणार आहे.

राज्यसभा निवडणूकीत संजय पवार लक्ष्य करून भाजपने खरा निशाणा संजय राऊत यांच्यावर लावला होता. मात्र ते थोडक्यात बचावले अगदी असाच सापळा खडसे यांच्यासाठी लावण्यात येवू शकतो. त्यामुळेच भाजपचे खासदार अनिल बोंडे म्हणाले, ‘भाई’ किंवा ‘भाऊ’ कोणीही एक पराभूत होवू शकतो. त्यामुळे निवडणुकीत कोणाचा विजय आणि पराभव होऊ शकतो हे सांगणं कठीण आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा