InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

गिरिश बापट यांची आज पुण्यात पहिली सभा, काँग्रेसचा उमेदवार ठरेना

भाजपने पुणे लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं तिकीट कापत पालकमंत्री गिरिश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आज गिरिश बापट हे आपली पहिली प्रचारसभा घेणार आहेत.

गिरिश बापट हे आज आपली पहिली प्रचार सभा कोथरूड येथील शिक्षकनगर सोसायटीमध्ये आज घेणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत. एकीकडे भाजपने आपल्याला प्रचाराला सुरूवात केली असून, दुसरीकडे काँग्रेसचा पुण्यातील उमेदवार देखील निश्चित झालेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply