InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भाजपाच्या विकासाचे अजगरी वेटोळे महागड्या मेट्रोभोवतीच पडले – शिवसेना

औद्योगिक गुंतवणुकीत नेहमी अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला कर्नाटकने मागे टाकल्यावरुन शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. गुजरात विकासाचे ‘मॉडेल’ संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून तिथेही गुंतवणूकदारांची संख्या घटली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

कर्नाटकात गेल्या दहा वर्षांपासून बिगर भाजप शासन सत्तेवर आहे व महाराष्ट्र, गुजरातेत भाजपचे ‘मेक इन इंडिया’ राज्य आहे. तरीही या दोन्ही राज्यांची औद्योगिक, आर्थिक घडी विस्कटलेली दिसते. भाजपाच्या विकासाचे अजगरी वेटोळे महागड्या मेट्रोभोवतीच पडले असून काही उद्योगपतींच्या सोयीसाठी ‘अवनी’ नावाच्या वाघिणीस मारले जाते, असा टोलाही त्यांनी लगावला.

कर्नाटकने झेप घेतली याचे दुःख नाही, पण महाराष्ट्र का घसरलो याचीच टोचणी असल्याची खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे. शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून भाजपावर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या –

 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.