InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भाजप आमदाराने महिलेला मारल्या लाथा

- Advertisement -

गुजरातमध्ये भाजपा आमदाराने चक्क एका महिलेला लाथा मारल्याचा प्रकार समोर आलाय. नरोदामधील भाजपा आमदार बलराम थवानी यांनी एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीतू तेजवानी असे जखमी महिलेचे नाव असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर्ड प्रमुख आहेत. बलराम थवानी आणि त्यांचे समर्थक महिलेला मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. अहमदाबाद मिररने हे वृत्त दिले आहे.

पाणी टंचाईची तक्रार करण्यासाठी नीतू तेजवानी त्या भागातील नागरिकांसोबत बलराम थवानी यांच्या कार्यालयात गेल्या होत्या.

- Advertisement -

मला मागून कोणीतरू धक्काबुक्की केल्याने त्या दरम्यान अपघाताने मी त्या महिलेला लाथ मारली असेल. असे घडायला नको होते असे स्पष्टीकरण बलराम थवानी यांनी दिले.

शिवाजी महाराजांचा जन्म शुद्र जातीत; पायल रहतोगीचं वादग्रस्त ट्विट

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.