भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष, त्यांना आमच्या शुभेच्छा; संजय राऊतांचा चिमटा

मुंबई : सध्या राज्यात नगरपंचायत निवडणुकीमूळे वातावरण तापलं आहे. या निवडणुकांचे आज निकाल लागले आहेत. मात्र भाजपा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहिल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या निवडणूक निकालानंतर फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील नगर पंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचे मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आले आहेत.

तसेच मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला, तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील. भाजपाच्या २४ आणि सहयोगी मिळून सर्वाधिक ३० नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली. सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक ४१५ हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे, असा दावा फडणवीसांनी केला आहे.

यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला चिमटा काढला. ‘नगरपंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष झाला आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत, पण भाजप पहिल्या क्रमांकावर असून नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी त्यांचे स्थान कायम राखल्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो. अशीच लढाई हा क्रमांक कायम ठेवण्यासाठी लढच राहा अशा मी शुभेच्छा देतो.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची एकत्रित बेरीजच करावी लागेल. ती तुमच्यापेक्षा अधिकच आहे, असा चिमटा राऊत यांनी भाजपला काढला. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना इतरही मुद्द्यांवर भाष्य करत भाजपला लक्ष्य केले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा