InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘भाजपचा सकारात्मक विचार त्यांच्या प्रकृतीसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत उत्तम’

- Advertisement -

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमधला युतीबद्दल दिवसेंदिवस सस्पेन्स वाढत चालला आहे. एकीकडे भाजपकडून युतीबाबत सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे सेनेचे नेते संजय राऊत यांनी युतीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर आपली भूमिका मांडली.

‘आम्ही तर कुठेच चर्चेत नाही. त्यामुळे चर्चा कुठे चालू आहे, हे आम्हाला माहित नाही. जर कुठे बोलणी गुप्तपणे चालू असतील तर चालू राहु द्या’, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ‘माणसानं राजकारणात सकारात्मक राहावं. भाजप आमचे मित्र जर सकारात्मक विचार करत असतील तर त्यांच्या प्रकृतीसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत उत्तम आहे.’ असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.