InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

- Advertisement -

शिक्षणमंत्री होश मे आओ, विनोद तावडे गो बॅक, विनोद तावडे खुर्ची खाली करा अशा घोषणा देऊन छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिक्षणमंत्र्यांना मुंबईत काळे झेंडे दाखविले.

- Advertisement -

१०वी, १२वी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी विनोद तावडे रविंद्र नाट्य मंदिर येथे होते. तेव्हा एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे २० गुण कमी केल्याप्रकरणी  विनोद तावडे यांचा निषेध छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केला.

छात्रभारतीचे मुंबई अध्यक्ष रोहीत ढाले, उपाध्यक्ष विशाल कदम, सुनिल राठोड, विकास पटेकर, सचिन काकड, जितेश किर्दकुडे, अविनाश बनसोडे, आशिष जाधव, निकेत वाळके, समीर कांबळे, निलेश झेंडे, दिपाली आंबे, रेवत थोरात आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.