Blackheads | ब्लॅकहेड्स दूर करायसाठी करा ‘हे’ सोपे उपाय

Blackheads | टीम महाराष्ट्र देशा: आपल्या सर्वांना चेहऱ्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. ब्लॅकहेड्स ही त्यातील एक मोठी समस्या आहे. ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक ब्युटी ट्रीटमेंट आणि बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, हे उपाय त्वचेसाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती पद्धतीचा वापर करू शकतात. हे उपाय केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही खालील टिप्स फॉलो करू शकतात.

बेसन आणि पपई (Besan and papaya-For Blackheads)

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी बेसन आणि पपई उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये आवश्यकतेनुसार पपई मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला ते साधारण 15 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. पंधरा मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून तीन वेळा या मिश्रणाचा वापर करू शकतात.

बेसन आणि ग्रीन टी (Besan and green tea-For Blackheads)

बेसन आणि ग्रीन टीच्या मदतीने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करता येऊ शकतात. यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसनामध्ये आवश्यकतेनुसार ग्रीन टी मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर हे मिश्रण तुम्हाला ब्लॅकहेड्सवर लावावे लागेल. दोन मिनिटे हलक्या हाताने स्क्रब केल्यानंतर तुम्हाला हे मिश्रण साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर राहू द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स सहज दूर होऊ शकतात.

बेसन आणि हळद (Besan and Turmeric-For Blackheads)

बेसन आणि हळद आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर या मिश्रणाच्या मदतीने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसनामध्ये चिमूटभर हळद आणि खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण वीस मिनिटे ब्लॅकहेड्सवर लावून ठेवावे लागेल. आठवड्यातून दोन वेळा या मिश्रणाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स सहज दूर होऊ शकतात.

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्ही वरील उपायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर तेलकट केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

खोबरेल तेल (Coconut oil-For Oily Hair)

तेलकट केसांच्या समस्येवर मात करण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला खोबरेल तेल कोमट करून घ्यावे लागेल. साधारण दहा ते पंधरा मिनिटे मसाज केल्यानंतर तुम्हाला एक तास खोबरेल तेल केसांना राहू द्यावे लागेल. एक तासानंतर तुम्हाला तुमची केस शाम्पूने धुवावे लागतील. नियमित असे केल्याने तेलगट केसांची समस्या दूर होऊ शकते.

कोरफड (Aloevera-For Oily Hair)

कोरफडीच्या मदतीने तेलकट केसांची समस्या दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला एक कप पाण्यामध्ये कोरफडीचा गर आणि लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या मिश्रणाने केसांना मसाज करावी लागेल. मसाज झाल्यानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागेल. या मिश्रणाच्या मदतीने केसातील अतिरिक्त तेल निघून जाते आणि केस चमकदार होतात.

ग्रीन टी (Green tea-For Oily Hair)

ग्रीन टी केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला ग्रीन टीच्या दोन ते तीन बॅग्स पाण्यात उकळून घ्याव्या लागतील. त्यानंतर ते पाणी कोमट झाल्यावर साधारण अर्धा तास तुम्हाला ते केसांमध्ये लावून ठेवावे लागेल. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमचे केस सामान्य पाण्याने धुवावे लागतील. ग्रीन टीच्या मदतीने केसातील चिकटपणा दूर होतो आणि केस चमकदार होतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या