Blood Donation Benifits | रक्तदान केल्याने शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

टीम महाराष्ट्र देशा: ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ Blood Donation असे आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. कारण रक्तदान करून तुम्ही अनेकांचे प्राण वाचवू शकता. पण बहुदा लोक रक्तदान करण्यास घाबरतात. रक्तदान केल्यामुळे शरीरात अशक्तपणा निर्माण होईल असे त्यांना वाटते. असे नसून रक्तदान केल्याने शरीर निरोगी आणि आजारांपासून दूर राहते. रक्तदान हृदयासाठी खूप फायदेशीर मानले जाते. रक्तदान केल्यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते. त्याचबरोबर रक्तदान केल्याने कर्करोगाचा धोकाही कमी होतो. रक्तदान करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे. त्यामुळे लोक रक्तदान करण्यास घाबरतात. त्यामुळे या बातमीच्या आम्ही तुम्हाला रक्तदानाचे फायदे सांगणार आहोत.

रक्तदामुळे शरीराला होणारे फायदे

रक्तदान केल्याने आपण हृदयरोगापासून दूर राहू शकतो

सर्वात मोठा फायदा म्हणजे रक्तदान केल्याने आपले हृदय निरोगी राहते. रक्तदानामुळे हृदयविकाराच्या झटका येण्याचा धोका देखील कमी होतो. रक्तदान केल्यामुळे शरीरातील आयरनचे प्रमाण व्यवस्थित राहते.

रक्तदानामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो

जर तुम्ही नियमितपणे रक्तदान करत असाल तर तुमच्या शरीरातील आयरनचे प्रमाण व्यवस्थित राहते आणि त्यामुळे कर्करोगाचा धोका टळू शकतो. रक्तदान केल्याने अनेक प्रकारच्या कर्करोगापासून आपण दूर राहू शकतो.

रक्तदान केल्याने वजन नियंत्रणात राहते

रक्तदान केल्याने वजन तर कमी होतेच पण त्याबरोबर जास्तीत जास्त कॅलरीज देखील बर्न बनवतात. रक्तदान केल्यामुळे काही महिन्यानंतर लाल रक्तपेशींची पातळी समान होते. नियमित रक्तदान, पोषक, आहार आणि व्यायाम या गोष्टी जर एकत्र केल्यास तर तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्याला कधीच सामोरे जावे लागणार नाही.

रक्तदान केल्याने एकंदरीत आरोग्य चांगले राहते

जे लोक नियमित रक्तदान करतात त्यांचे आरोग्य इतरांपेक्षा सुदृढ राहते. रक्तदान केल्याने BP देखील नियंत्रणात राहतो. त्याचबरोबर रक्तदान करून तुम्ही कोणाचा तरी जीव वाचवत आहात या विचारामुळे मानसिक स्थिती ही तुमची व्यवस्थित राहते.

रक्तदान कधी करावे

निरोगी व्यक्तींनी दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे असे डॉक्टर आणि तज्ञ सांगतात. त्यामागील कारण म्हणजे शरीरातील रेड सेल्स 90 ते 120 दिवसांमध्ये आपोआप मारतात आणि नवीन पेशी तयार होऊ लागतात त्यामुळे डॉक्टर दर 3 महिन्यांनी रक्तदान करण्याचा सल्ला देतात.

टीप : वरील गोष्टींसाठी डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.