Blood Pressure | टीम कृषीनामा: आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आणि संतुलित आहारामुळे बहुतांश लोकांमध्ये कमी रक्तदाबाची समस्या दिसून येते. त्याचबरोबर सतत एकाच ठिकाणी बसून दीर्घकाळ काम करणाऱ्या लोकांना देखील कमी रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागते. पूर्वी ही समस्या फक्त वृद्धांमध्ये दिसून यायची. मात्र, आजकाल तरुणांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही फळांचा समावेश करू शकतात. या फळांचे सेवन केल्याने कमी रक्तदाबाची समस्या कमी होऊ शकते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील फळांचा समावेश करू शकतात.
संत्रा (Orange to Control Blood Pressure)
कमी रक्तदाबाच्या समस्येला झुंज देत असणाऱ्यांसाठी संत्र्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. कारण संत्र्यांमध्ये आढळणारे गुणधर्म रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. तुमचा रक्तदाब जर कमी झाला असेल तर तुम्ही संत्र्याच्या रासचे सेवन करू शकतात.
किवी (Kiwi to Control Blood Pressure)
कमी रक्तदाबामध्ये किवीचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. किवीमध्ये असे काही गुणधर्म आढळून येतात, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. एका संशोधनानुसार, कमी रक्तदाबामध्ये दररोज एक ते दोन किवी खाणे फायदेशीर ठरू शकते.
द्राक्ष (Grapes to Control Blood Pressure)
तुम्ही जर कमी रक्तदाबाच्या समस्येला झुंज देत असाल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये द्राक्षाचा समावेश केला पाहिजे. द्राक्षामध्ये आढळणारे गुणधर्म रक्तवाहिन्यांना आराम देण्याचे काम करतात. त्यामुळे द्राक्षाचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. रक्तदाब कमी असताना द्राक्षाच्या रसाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
ॲवोकॅडो (Avocado to Control Blood Pressure)
ॲवोकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात फॅटी ॲसिड आणि विटामिन बी आढळून येते. त्याचबरोबर ॲवोकॅडोमध्ये आढळणारे फोलेट रक्तदाब कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही जर रक्तदाबाच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या आहारात ॲवोकॅडोचा समावेश करू शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या