Blur Release | ‘या’ दिवशी OTT वर रिलीज होणार तापसी पन्नूचा ‘ब्लर’

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapasee Pannu) ‘ब्लर’ (Blur) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. ‘शाबास मिठू’ आणि ‘दोबारा’ हे तापसीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले काम करू शकले नाहीत. अशात तापसीचा आगामी चित्रपट ‘ब्लर’ ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नूने बुधवारी तिच्या सोशल मीडियावर ‘ब्लर’चे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. त्याचबरोबर तिने तिच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट देखील या पोस्टच्या माध्यमातून शेअर केली आहे.

या दिवशी रिलीज होणार तापसीचा ब्लर (Blur) 

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे आगामी चित्रपट ‘ब्लर’ची रिलीज डेट जाहीर केली आहे. तापसीने तिच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर ‘ब्लर’चे मोशन पोस्टर शेअर केले आहे. तापसीचा ‘ब्लर’ चित्रपट पुढील महिन्यात 9 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 ॲपवर प्रदर्शित होणार आहे. हे वर्ष तापसीसाठी एवढे खास नव्हते. पण चाहते तिच्या आगामी चित्रपट ‘ब्लर’ची आतुरतेने वाट बघत आहे.

‘ब्लर’ या चित्रपटामध्ये तापसी मुख्य भूमिकेच्या पात्रासह या चित्रपटाची निर्मिती म्हणून देखील काम करत आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टर वरून असे लक्षात येत आहे की तापसी या चित्रपटांमध्ये डबल रोल करताना दिसू शकते. त्याचबरोबर तापसीने शेअर केलेल्या पोस्टला तिने कॅप्शन मध्ये लिहिले होते की, “जे दिसते त्यापेक्षा ते नेहमीच जास्त असते.”

तापसी पन्नूचे चाहते तिच्या आगामी चित्रपट ‘ब्लर’साठी खूप उत्सुक दिसत आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची ही उत्सुकता अजूनच वाढली आहे. ‘ब्लर’ हा चित्रपट स्पॅनिश हॉरर थ्रिलर ‘जुलियाज आईज’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याची माहिती आहे. 2010 साली प्रदर्शित झालेल्या या स्पॅनिश चित्रपटांमध्ये दोन जुळ्या बहिणींची कथा दाखवण्यात आली होती. ‘ब्लर’ या चित्रपटांमध्ये अभिनेत्री तापसी सोबत अभिनेता गुलशन देवैया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.