बॉलिवूड अभिनेत्री युविका चौधरी हरियाणा पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री युविका चौधरीला अनुसूचित जातीबाबत टिप्पणी आणि अपमानास्पद वक्तव्याबाबत प्रकरणी हरियाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ३ तास हरियाणा पोलीस युविकाची चौकशी करत होते. त्यानंतर औपचारिक जामिनावर तिला सोडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, हायकोर्टाच्या आदेशानुसार, युविका चौधरीची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. चौकशी वेळी युविका सोबत पती प्रिंस नरुला तिचे वकील आणि इतर काही लोक उपस्थित होते. युविकाने याच वर्षी मे महिन्यात तिच्या ब्लॉग वरुन अनुसूचित जातीविषयी टिप्पणी केली होती. सामाजिक कार्यकर्त्या रजत कलसन यांनी अभिनेत्री युविका चौधरी हिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.

कलसन यांनी म्हटले आहे की, प्रसिद्ध हिंदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच बबीता जी हिच्या विरोधात देखील हांसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र तिच्या अटकेची नोटीस अद्याप जारी करण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा