उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणताच बॉलीवूडच्या दिग्दर्शकाची ‘अशी’ प्रतिक्रिया

कंगना राणौत सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत कंगनाने अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा उल्लेख ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ असा केला. यानंतर या दोघींमध्ये वाद सुरू झाला आहे. उर्मिला देखील कंगनाला प्रत्युत्तर देत आहे. या दरम्यान आता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करून उर्मिलाला साथ दिली आहे.

राम गोपाल वर्माने ट्विटमध्ये म्हटलंय की,’मला यामध्ये नाही पडायचं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की, उर्मिला मातोंडकरने रंगीला, सत्या, कौन, भूत, एक हसीना थी सारख्या सिनेमांत कॉम्प्लेक्स भूमिका साकारून आपलं वेगळंपण सिद्ध केलं आहे.’ उर्मिलाने राम गोपाल वर्मा यांच्यासोबत ‘रंगीला’ सिनेमात काम केलं असून आपलं वेगळंपण सिद्ध केलं आहे. दोघांनी यासोबत अनेक सिनेमांत काम केलं आहे. जे सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.