‘मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही’; अजित पवारांनी योगी आदित्यनाथांना खडसावले

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावर असताना भव्य फिल्मसिटी ही उत्तरप्रदेशला उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मुंबईत बॉलीवू़डला बदनाम करून उत्तर प्रदेशात हलवण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेते करीत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे योगी सरकारला इशारा दिला आहे.

राज्यात आजपासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह उघडण्यात येणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली नाटकाची तिसरी घंटा आता वाजणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे तिसरी घंटा झाली. अजित पवारांच्या हस्ते नटराजांचं पूजन करुन औपचारिकरित्या नाट्यृगह पुन्हा सुरु करण्यात आली आहेत.

याचवेळी फिल्मसिटी उत्तर प्रदेश येथे हलवण्यावरून अजित पवारांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इशारा दिला आहे. मुंबईतील बॉलिवूड बाहेर जाऊ देणार नाही. सर्वोतपरी सहकार्य हे सरकार करेल आणि सुविधा उपलब्ध करून देईल. काही लोकांचे प्रयत्न आहेत की बॉलीवूड महाराष्ट्रातून बाहेर घेऊन जायचं. त्यासाठी एका राज्याचे मुख्यमंत्री इथे आले देखील होते. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र बॉलिवूड मुंबईतच राहिल, असे त्यांनी योगी आदित्यनाथ यांना खडसावले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा