InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

बॉलिवूडमधील दिशाही स्त्री-पुरूष विषमतेची बळी; ट्रोलिंगला दिले रोखठोक उत्तर

- Advertisement -

प्रसिद्धीबरोबर ट्रोलिंगलाही सामोरे जाणाऱ्या कलाकारांपैकीच एक बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी. बॉलिवूडमध्ये स्त्रीयांना मोकळीक असते, असे वाटत असले तरी बॉलिवूडमधील स्त्रियांनाहा स्त्री- पुरूष विषमतेला बळी जावे लागते, हे अशा उदाहरणावरून वारंवार दिसते. तिला आदित्य ठाकरेंसोबत पाहण्यात आले होते. या गोष्टीमुळे दिशाला भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

मुंबईतील एका हॉटेलबाहेर आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा अभिनेत्री दिशा पटानीसोबत स्पॉट करण्यात आलं होतं. दिशासोबत यापूर्वीदेखील आदित्य ठाकरे एका डिनरसाठी गेले होते.

- Advertisement -

या ट्रोलिंगमध्ये मुख्यतः टायगर श्रॉफचा उल्लेख होता. ‘एक था टायगर’पासून ते ‘टायगर जिंदा है’ अशा अनेक कंमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. या सगळ्या ट्रोलिंगला दिशाने रोखठोक उत्तर दिलं आहे.

दिशाने चाहत्यांच्या या प्रश्नांना योग्य उत्तर दिलं आहे. ती म्हणाली की, “मित्र जेवणासाठी एकत्र जाऊ शकत नाहीत का? मैत्री करताना आपण मैत्री करताना आपण स्त्री अथवा पुरुष असा विचार करत नाही. माझ्या फक्त मैत्रिणीच नाही तर मित्रही आहेत. प्रत्येकालाच मित्र व मैत्रिणीही असतात.” दिशा असंही म्हणाली की, मी असं करियर निवडलं आहे की जिथे मी कायम लोकांच्या नजरेत राहणार आहे. लोक नेहमी माझ्याबद्दल मतं बनवणारच आहेत. त्यामुळे मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही.”

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.